

भारतीय पुरातन संस्कृतीने ज्या विविध देवदेवतांच्या रूपांचा कथाविष्कार केला त्यात मारुती, हनुमान, हनुमंत या नावाने एक दिव्य वलय लोकमानसात निर्माण केले आहे. मारुती किंवा हनुमान हा भारतीय परंपरेने उभा केलेला एक आदर्श आहे. मारुती हा रामभक्त म्हणून रामायण काळात प्रसिद्ध पावला, शिवाय त्याला चिरंजीवित्वाचे वरदानही लाभलेेले आहे.
मारुती हा मनोजय आहे. मनाचा वेगही त्यापुढे कमी पडतो, तो बुद्धिमतां वरिष्ठ आहे. बुद्धिमान, शक्तिमान, गतिमान तरीही नम— म्हणूनच महान. चिरंजीवित्वाचा हा अर्थ आहे. कवीने त्यावेळी इंद्राने मारलेल्या वज—ामुळे त्यांची हनुवटी प्रहाराने जखमी झाली. म्हणून त्यास हनुमंत असे नाव मिळाले. मरूत म्हणजे वारा. त्याचा पुत्र म्हणून मारुतीही संज्ञा मिळाली. चैत्र शुद्ध 15 हा त्यांचा जन्मोत्सव दिन सर्वत्र परंपरेने साजरा होतो. उत्तर भारतात हनुमानगढी प्रसिद्ध आहे. 'हनुमान चालिसा'चे वाचन-पठण सर्वत्र केले जाते. हनुमान हा दु:खमय नष्ट करणारा आहे. हनुमतांची दोन रूपे आहेत. समर्थ रामदास स्वामी यांनी हनुमंताची उपासना अर्थात बळाची उपासना हा आदर्श तत्कालीन संदर्भाचा विचार करून ठेवला. जनमानस हतोत्साहीत, शक्तीहीन झालेले होते. अशा काळात मुस्लिम आक्रमणाला प्रतिरोध करण्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक मानली. मारुतीची मंदिरे स्थापन केली. मूर्ती स्थापन केल्या. त्यात दोन प्रकारच्या मूर्ती आहेत. एक वीरमारुती आणि दुसरा दासमारुती! वीरमारुती म्हणजे शक्तियुक्त द्रोणागिरी उचललेला, कालनेमीवर पाय ठेवलेला उग्र स्वरूप हनुमंत, तर दासमारुती म्हणजे नम— असलेला, बैठा मारुती. वीरासनात असलेला.
समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या मारुती विषयीच्या स्त्रोत्रात 'भीमरूपी महारूद्रा वज— हनुमान मारुती' म्हणून द्रोणागिरी पर्वत आणल्याचे, पर्वतप्रायरूप प्रकट केले आहे. भूत-प्रेत-समंध नष्ट करणारा हा मारुती आहेे. दासमारुती हा रामभक्त बैठा असलेला परम विनयशील आहे. यातून एक संदेश भारतीय परंपरेला द्यायचा आहे. जो शक्तिमान, वीर पराक्रमी आहे, तो नम—ही असला पाहिजे. तो दासही असावा; पण कोणाचा? तर रामाचा. नियंत्रित-सुंतलित विचारांचा दास हवा. हे दास्यत्व नाही, तर शक्ती असून, सामर्थ्य असूनही स्वामीभक्ती श्रेष्ठ आहे. मारुती हा मनोजय आहे. मनाचा वेगही त्यापुढे कमी पडतो, तो बुद्धिमतां वरिष्ठ आहे. बुद्धिमान, शक्तिमान, गतिमान, तरीही नम— म्हणूनच महान. चिरंजीवित्वाचा हा अर्थ आहे. मारुती-किंवा हनुमान हा भारतीय परंपरेने उभा केलेला एक आदर्श आहे. जेथे रामायण, तेथे मारुती असणारच. एवढा तो रामभक्त आहे. वाल्मिकी रामायणात तो किंपुरुष असल्याचे म्हटले आहे. किष्किंधा नगरीत सुग्रीवासोबत हनुमंत होता, तो किंपुरुष जातीचे वानरांची एक प्रजात म्हणून; पण त्यांना वानर म्हणणे चुकीचे होईल, कारण त्या नगरीचे वर्णन आधुनिक अद्ययावत आहे. मारुतीने रामायण लिहिल्याचेही परंपरा मानते. वाल्मिकी रामायणाची ख्याती पाहून त्यांनीही आपल्या नखाग्रांनी दगड-धोंड्यावर रामायण रचले, त्यास 'हनुमन्नाटिका' म्हणतात! आज संस्कृत नाटकात 'हनुमन्नाटिके'चा उल्लेख येतो. त्या ग्रंथाचे संस्कार, प्रभाव पुढील अनेक ग्रंथकारांवर पडलेले आढळतात. त्यातील श्लोक बहारदार आहेत. हनुमन्नाटिकाचा आधार अनेक मराठी कवींनीही घेतला आहे. आज हनुमान जयंतीनिमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्व, व्यक्तित्व आणि काव्य-आदर्श यांचे हे चिंतन!
– डॉ. विद्यासागर पाटगणकर, अध्यात्म अभ्यासक