Delhi liquor scam : मनीष सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

Delhi liquor scam : मनीष सिसोदिया तुरुंगातच राहणार, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

नवी दिल्ली, 31 मार्च, पुढारी वृत्तसेवा – Delhi liquor scam : मनीष सिसोदिया यांना राऊस एव्हेन्यू कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी न्यायालयाने सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता सिसोदिया यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

आठवडाभरापूर्वी या प्रकरणाची Delhi liquor scam सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने सिसोदिया यांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता. केंद्रीय अन्वेषण विभागाने मद्य घोटाळा प्रकरणाचा तपशील आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर सादर केले होते.

सीबीआयच्या युक्तिवादापूर्वी, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्रायल कोर्टात त्यांच्या जामीन याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितले होते की, त्यांना कोठडीत ठेवल्याने सीबीआयचा हेतू साध्य होणार नाही. या प्रकरणात Delhi liquor scam सर्व वसुली यापूर्वीच झाली आहे.

विशेष म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी मनीष सिसोदिया यांना दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी Delhi liquor scam सीबीआयने अटक केली होती. त्याच वेळी, ईडीने त्यांना 9 मार्च रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही मनीष सिसोदिया यांना जामीन मिळालेला नाही.

हे ही वाचा :

Manish Sisodia : मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ

Child Mobile Addiction: मुलांच्या ‘मोबाईल ॲडिक्‍शन’मुळे हैराण आहात? ‘हे’ उपाय करा

संजय राऊत यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करावा; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

Back to top button