शेतकरी मेटाकुटीला! ३ टन कलिंगड विक्रीतून हाती काहीच नाही, उलट स्वत:च्या खिशातून गेले ५६० रूपये | पुढारी

शेतकरी मेटाकुटीला! ३ टन कलिंगड विक्रीतून हाती काहीच नाही, उलट स्वत:च्या खिशातून गेले ५६० रूपये

करमाळा; तालुका प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील बिटरगाव वांगी येथील शेतकऱ्याने सोलापूर बाजार समितीत ३ टन कलिंगडाची विक्री केली. पण, या विक्रीनंतर शेतकऱ्याला डोक्याला हात लावण्याची वेळ आली. कलिंगड विक्रीतून पैसे तर आले नाहीच पण त्यांना स्वत:च्या खिशातून ५६० रूपये अधिकचे खर्चुन रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.

रामभाऊ रोडगे यांनी त्यांच्या शेतात कलिगंडचे उत्पादन घेतले होते. यातील ३ टन कलिंगड त्यांनी सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले. यामध्ये सोलापूर बाजार समितीच्या लिलावात तीन टन कलिंगडाला कॅरेट प्रमाणे किरकोळ दर मिळाला.

त्या रोडगे यांना एकूण त्यांना ३ हजार ४०० रूपये पट्टी मिळाली. यामध्ये गाडी भाडे ३ हजार रूपये व हमाली ९६० रूपये असे ३ हजार ९६० रूपये खर्च झाला. यातून रामभाऊ रोडगे यांना पदरचे ५६० रूपये द्यावे लागले. या उदाहरणातून शेतकऱ्यांची कशी पिळवणूक होते हे निदर्शनास येते. या घटने शेतकरी वर्ग चिंता पसरली आहे. कांद्यापाठोपाठ आता कलिंगडाचेही तीनतेरा वाजले आहेत. रमजान महिना, तीव्र उन्हाळ्याचे गणित मांडून शेकडो शेतकऱ्यांनी कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. हंगामी पिके घेत शेतकरी थोड्याशी नफ्याची आशा करीत असतो मात्र अशा निर्दयी व्यवस्थेमुळे शेतकऱ्याचा नफातर तर दुरच उलट शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

कलिंगड विक्रीतून पैसे काहीच आले नाही. एकूण पट्टी वजा ५६० रुपये झाली आहे. कलिंगड तोडणीचा खर्च २ हजार ५०० रुपये वेगळा झाला आहे. एकरी कलिंगड उत्पादन खर्च एक लाख रूपये होतो. उत्पादन दहा टन धरले व भाव नाही मिळाला तर शेतकऱ्यांना लाखो रूपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

सुमारे तीन टन कलिंगड सोलापूर बाजार समितीत विक्रीस नेले होते. कॅरेटवर भाव झाल्याने पैसे मिळाले नाहीत. चांगला माल असताना ही तोटा झाला. मोटार भाडे, हमाली, येणे-जाणे उत्पादन खर्च याचा विचार केल्यास मोठे नुकसान झाले आहे.
रामभाऊ रोडगे , शेतकरी, बिटरगाव वांगी

 

अधिक वाचा :

Back to top button