गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा; बॅनर फडकवत महाविकास आघाडीचे आंदोलन | पुढारी

गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा; बॅनर फडकवत महाविकास आघाडीचे आंदोलन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गुजरातचा निरमा, क्लीनचीट मिळवा… पन्नास खोके, एकदम ओके…गुजरात निरमा… ईडी, सीबीआय, आयटी मागे नाही लागणार… वॉशिंग मशीन खोके, आणि गुजरातचा निरमा, महाशक्तीला पाठिंबा द्या आणि क्लीनचीट मिळवा… गुजरात निरमा अभियान, चला पवित्र होऊन येऊ…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायर्‍यांवर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा सतरावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. गुजरातचा निरमा आणि वॉशिंग मशीनचे बॅनर घेऊन महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

हेही वाचा : 

Back to top button