पुणे : वेताळे यात्रेतील शर्यतीत 180 बैलगाड्यांचा सहभाग | पुढारी

पुणे : वेताळे यात्रेतील शर्यतीत 180 बैलगाड्यांचा सहभाग

कडूस : पुढारी वृत्तसेवा : वेताळे(ता.खेड) येथील सिध्देश्वर महाराजांच्या यात्रेत होणा-या बैलगाडा शर्यतीत 180 बैलगाड्यांनी सहभाग घेतला. घाटाचा राजा किताब सरपंच वर्षा बच्चे यांनी पटकावला. फायनलसाठी 11.20 सेकंदांत वाडाचे नीलेश घनवट यांच्या बैलगाड्यांनी बाजी मारत मोटारसायकल पटकावली. दुसरा क्रमांक 11.61 सेकंदांची वेळ नोंदवत राजगुरुनगरच्या सचिन भंडलकर यांनी पटकावला. तृतीय क्रमांक वाळदचे दामुशेठ लांडगे यांना, तर चतुर्थ क्रमांक कडधेचे (ता.मावळ) प्रवीण शेठ धावडे यांनी पटकावला. फळीफोड बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक आर्वी (ता.जुन्नर)तील नानासाहेब गुळवे यांना मिळाला. द्वितीय क्रमांक मोहकलचे बबन बेंडुरे, तृतीय क्रमांक दोंदेतील भैरवनाथ बैलगाडा संघटनेने पटकावला. चतुर्थ क्रमांक कडुसचे महेंद्र डांगले यांनी मिळवला.

बक्षीस वितरण सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे, दिनेश कड आदींसह ग्रामस्थ, पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले. सायंकाळी ऑर्केस्ट्रा झाला. मंगळवारी सकाळी देवतोरणे येथील भैरवनाथ प्रासादिक भजनी मंडळाकडून भारूड झाले. रात्री श्रीराम कला पथक, पवळेवाडी यांचे भारूड झाले. बुधवारी (दि.22) भारुडाच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाडवा वाचन केले.
सायंकाळी कुस्ती आखाडा झाला. पुण्याच्या नामांकित पहिलवानांच्या चितपट कुस्त्या आकर्षण ठरल्या. राष्ट्रीय विजेता रामा सुरवडकर, शुभम गवळी , पवन माने, संतोष राजपुत्र, यशराज बोंबले आदींनी स्पर्धेत भाग घेतला. अनिकेत शेखर आणि तुळशिराम मोरे यांच्यात झालेल्या आकर्षक कुस्तीत चांदीची गदा अनिकेतने पटकावली. यात्रेचे संयोजन साहेबराव बोंबले, बंडोपंत बोंबले, विठ्ठल बोंबले, बी.के.कदम, बाबाजी वाळुंज,उपसरपंच योगेश बोंबले, अ‍ॅड. प्रवीण बोंबले, पिंट्या बोंबले,सयाजी पाटील, दिनेश शिंदे आदींनी केले.

मुलींच्या कुस्त्या ठरल्या लक्षवेधी
आखाड्यात मुलींच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या. त्रिशा काळे (ढाकाळे), सानिया महानवर (बारामती) यांच्या कुस्तीला दाद मिळाली. उपस्थितांनी सर्व महिला कुस्तीपटूंना रोख बक्षिसे दिली.

Back to top button