राहुल गांधींकडून लोकशाहीचा अपमान, पण दोष 'गांधी' आडनावाच्या सर्व लोकांना दिला जाऊ शकत नाही : कायदा मंत्री रिजिजू | पुढारी

राहुल गांधींकडून लोकशाहीचा अपमान, पण दोष 'गांधी' आडनावाच्या सर्व लोकांना दिला जाऊ शकत नाही : कायदा मंत्री रिजिजू

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशाच्या लोकशाहीचा, घटनात्मक संस्थांचा तसेच लष्कराचा अपमान केला आहे, पण यामुळे सारा दोष गांधी आडनावाच्या लोकांना दिला जाऊ शकत नाही, असा टोला केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी शुक्रवारी (दि.२४) सोशल मीडियाच्या माध्यमातून मारला.

राहुल गांधी यांनी ‘मोदी’ आडनावावरून केलेली टिप्पणी चुकीची होती, असे सांगत सुरत न्यायालयाने गांधी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचा संदर्भ देत रिजिजू यांनी हा टोला मारला. राहुल गांधी यांनी केलेली वक्तव्ये अतिशय आक्षेपार्ह आहेत. त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आणि असे असूनही काँग्रेसचे काही लोक त्यांचा बचाव करु पाहत आहेत, असे रिजिजू यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी देखील गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुरतच्या न्यायालयाने गांधी यांना दोषी ठरविले. पण काँग्रेस आणि त्यांचे तमाम नेते न्यायालयीन आदेशावर टीका टिप्पणी करीत आहेत. राहुल गांधी आणि काँग्रेस स्वतःला कायद्याच्या वर समजते काय? असा संतप्त सवाल यादव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. ओबीसी समाजातील नेत्याच्या आडनावावरून संपूर्ण समाजाचा अपमान करणे, हे राष्ट्रीय नेत्याचे काम आहे का, असे सांगत प्रत्येकाने न्यायालयाच्या आदेशाचा आदर करणे गरजेचे आहे, अशी टिप्पणी यादव यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button