कोकणातील जनता ठाकरेंसोबतच; ५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या सभेने चित्र स्पष्ट झालंय : संजय राऊत | पुढारी

कोकणातील जनता ठाकरेंसोबतच; ५ मार्चला उद्धव ठाकरेंच्या सभेने चित्र स्पष्ट झालंय : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : खेड येथे उद्धव ठाकरेंनी ५ मार्चला घेतलेल्या सभेने सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. कोकणातील जनता ठाकरेंसोबतच आहे ते निवडणूकीत स्पष्ट होईल, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आजच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेड सभेबाबत म्हटले आहे.

कायदामंत्री किरण रिजीजूं न्यायालयावर दबाव आणत आहेत, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला आहे. सरकार विरोधी बोलणे हा देशद्रोह नाही. कायदामंत्र्यांकडून न्याययंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून संविधान आणि कायदा मानत नाही. न्यायव्यवस्था खिशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशाची न्यायव्यवस्था ही स्वतंत्र राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशाचे कायदामंत्री धमकी देत असतील तर तो देशाच्या संविधानाचा अपमान आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.
राहूल गांधींनी हुकुमशाहीविरोधात लंडनमध्ये आवाज उठवला म्हणून त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button