

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुभाष देसाई शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत पण त्यांच्या मुलाचा शिवसेनेशी काही संबंध नाही. तो कधीही शिवसेनेत सक्रीय नव्हता. शिंदे गट कधी बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागली आहेत. त्यांची मेगाभरती कुचकामी आहे, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूषण देसाईं यांच्या प्रवेशावर केली. आज (दि.१४) दिल्ली येथे माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी खासदार राऊत म्हणाले की, भूषण देसाईं यांच्यावर उदय सामंतांनी आरोप केले होते. त्या आरोपांच काय झाल? याच उत्तर शिंदे गटाने द्यावं. मिंधे गटाला आता गंमत वाटत आहे. पण भविष्यात या सर्व ओझ्यांच काय करायच हा प्रश्न असणार आहे. कितीही प्रवेश झाले तरी शिवसेनेवर त्याचा परिणाम होणार नाही. जनता जर खरच शिंदेंच्या पाठीशी असती तर संप झाले नसते, असा टोला त्यांनी लगावला. तो व्हिडिओ खरा की, खोटा ते आधी तपासावे, असे शीतल म्हात्रे प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले. महिलांचा सन्मान केला पाहीजे. पण काही गोष्टी राजकारणासाठी आणि सुडाने राजकारण करण्यासाठी केल्या जात असतील तर राजकीय कृतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा :