

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईत तृतीयपंथीयांकडून चालवले जाणारे पहिले सलून सुरू करण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर किंवा 'किन्नर' समाजातील लोकांना आजही नियमितपणे खूप भेदभावाला सामोरे जावे लागते. या समाजातील लोकांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबईत ट्रान्सजेंडर सलून सुरू करण्यात आले आहे.
ट्रान्सजेंडर समाजातील लोकांचे सक्षमीकरण करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी मुंबईत ट्रान्सजेंडर सलून सुरू करण्यात आले आहे. हे सलून ७ ट्रान्सजेंडर लोक चालवत आहेत. या सलूनची मालक जैनब स्वतः ट्रान्सजेंडर समुदायाची सदस्य आहे. जैनब म्हणाली की, किन्नर समाजातील लोकांना सक्षम बनवण्यासाठी हे पाऊल खूप महत्त्वाचे आहे. हे सलून ट्रान्सजेंडर लोकांना प्रशिक्षण तसेच रोजगार देण्यासाठी समर्पित होते. Deutsche Bank आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने सलून उभारण्यासाठी सहकार्य केले. ट्रान्सजेंडर समुदायाला खूप वेगळे आणि उपेक्षित मानले जाते, तिथे हे छोटेसे पाऊल समाजासाठी मोठी झेप ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा :