

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात सदनिका आणि मालमत्ता खरेदी-विक्री जोमात सुरू आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यात 24 लाख 14 हजार 963 दस्त नोंद झाले आहेत. त्यातून सुमारे 38 हजार 597 कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे. दरवर्षी 1 एप्रिल रोजी नवे वार्षिक रेडीरेकनरचे दर लागू होतात. या पार्श्वभूमीवर चालू महिन्यातील शेवटच्या आठ दिवसांत विक्रमी दस्तनोंदणी होण्याची शक्यता आहे.
जीएसटीनंतर सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग अशी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. जमीन, सदनिका, दुकाने आदींची खरेदी-विक्री, दोन व्यक्ती किंवा संस्थांमध्ये होणारे करार, बक्षीसपत्र, भाडेकरार अशा विविध दस्तांची नोंदणी करताना मुद्रांक शुल्क लागते. विभागासाठी सुरुवातीला 32 हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, जास्त महसूल मिळाल्याने आता 40 हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
एप्रिल – 2,11,912 – 1802.94
मे – 2,22,576 – 2807.77
जून – 2,41,286 – 3423.89
जुलै – 2,05,709 – 3536.52
ऑगस्ट – 1,97,577 – 3293.17
सप्टेंबर – 2,06,662 – 3429.81
ऑक्टोबर – 1,77,506 – 3484.72
नोव्हेंबर – 2,10,172 – 3542.44
डिसेंबर – 2,02,603 – 4027.94
जानेवारी – 2,17,574 – 3624.66
फेब्रुवारी- 2,25,179 – 3960.57
14 मार्च 2023 96,207 – 1633.01
———————————
एकूण 24,14,963 38,597.44
मागील काही वर्षांतील नोंद
वर्ष दस्तनोंदणी महसूल (कोटीमध्ये)
2020-21 27 लाख 68 हजार 492 25 हजार 651
2021-22 23 लाख 83 हजार 712 35 हजार 171
4 मार्च २०२३ पर्यंत 24 लाख 14 हजार 963 38 हजार 587.44