बोगस डॉक्टरचे महिलांशी अश्लील चाळे; चित्रफितीने खळबळ | पुढारी

बोगस डॉक्टरचे महिलांशी अश्लील चाळे; चित्रफितीने खळबळ

मुरगूड, पुढारी वृत्तसेवा : येथील एका तथाकथित बोगस डॉक्टरने महिलांशी अश्लील चाळे करणारी चित्रफीत तयार केली. ही चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. यासंदर्भात अनामिक महिलांनी शहरातील अनेकांना एकाचवेळी पत्र पाठविल्यामुळे दबक्या आवाजातील चर्चेला ऊत आला आहे.

दरम्यान, शहरातील प्रमुख राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांना या चित्रफितीच्या पेनड्राईव्ह पोस्टाने आल्याने या बोगस डॉक्टरच्या कारनाम्याचे बिंग फुटले आहे. त्यावर शहरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अपप्रवृत्तीला धडा शिकविण्याची मागणी

येथील एका बोगस डॉक्टरने आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी काही माहिलांबरोबर अश्लील चाळ्याचे चित्रण केले आहे. त्याने वैद्यकीय व्यवसायाच्या आडून लांच्छनास्पद प्रकार करून या व्यवसायात प्रामाणिकपणे काम करणार्‍या वैद्यकीय क्षेत्राला कलंक लावला आहे.

अभय द्या ः महिलांची अपेक्षा

अशाप्रकारचे अश्लील चित्रण करून ते जतन करून ठेवणार्‍या विकृत अप्रवृत्तीला धडा शिकवणे गरजेचे असल्याचे तसेच या डॉक्टरच्या कृत्याला पाठबळ देणार्‍यांचासुद्धा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक असल्याचे तसेच आपणास अभय मिळावे, अशी अपेक्षा या पत्रातून व्यक्त केली आहे.

तक्रार नाही; पोलिसांची भूमिका

दरम्यान, या संदर्भात कोणतीही तक्रार आली नसल्याचे मुरगूड पोलिसांनी सांगितले.

Back to top button