Covid-19 : महाराष्ट्रात कोरानाचे ४३७ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू | पुढारी

Covid-19 : महाराष्ट्रात कोरानाचे ४३७ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात कोविड-१९ च्या वाढत्या रुण्गसंख्येने पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आज (दि. २५) कोरोनाचे ४३७ नवीन रुग्ण आढळून आले, तर दोघाचा मृत्यू झाला आहे. तसेच २४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली आहे.

केंद्रीय मंत्री आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या देशात कोविड-१९ आजाराच्या नव्या व्हेरिएंटमुळे सतर्कता बाळगावी लागेल. मात्र याला घाबरुन जाण्याचे काहीच कराण नाही. आतापर्यंत देशात जितके व्हेरिएंट आढळून आले आहेत त्यावर आपली लस ही प्रभावशाली ठरत आहे.

फेब्रुवारी २०२३ च्या मध्यापासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू पण सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत देशातील सर्वाधिक सक्रिय कोविड-१९ प्रकरणे केरळ (२६.४ टक्के), महाराष्ट्र (२१.७ टक्के), गुजरात (१३.९ टक्के), कर्नाटक (८.६ टक्के) आणि तामिळनाडू (६.३ टक्के) यासारख्या राज्यांमध्ये नोंद झाली आहेत. या आजारामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी आरोग्याशी संबंधित खबरदारी घेणे आवश्यक आहे.

कोरोना स्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय मॉक ड्रिलचे आयोजन

देशात Covid-19 तसेच हवामान बदलामुळे होणाऱ्या संसर्गांचे प्रमाण वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर गर्दी असलेल्या तसेच बंद ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. केंद्र सरकारने कोरोनास्थितीचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजना संदर्भात १० आणि ११ एप्रिल रोजी राष्ट्रीय पातळीवर मॉक ड्रिलचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने आरोग्य मंत्रालयाने सोमवारी राज्यांसोबत बैठक बोलावली आहे.

मॉक ड्रिलमध्ये आयसीयूतील खाटा, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन, मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. सोमवारी २७ मार्चला मंत्रालय राज्यांसोबत बैठक घेणार असून या बैठकीतून मॉक ड्रिलसंबंधी माहिती दिली जाईल.

हेही वाचा

Back to top button