दैठणा : ७२ तासाच्या आत परतावा द्यावा, यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण | पुढारी

दैठणा : ७२ तासाच्या आत परतावा द्यावा, यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

तीर्थपुरी; पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी तालुक्यातील दैठणा येथे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी महाराष्ट्र सरकार व विमाकंपन्या यांनी ७२ तासाच्या आत नुकसान भरपाई द्यावी या मागणीकरिता घनसावंगी तालुक्यातील दैठणा (जि. जालना) गावाचे शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत.

विमाकंपन्या जाहिरातबाजी करून विमा भरून घेतात. मात्र, ज्या वेळेला विमा देण्याची वेळ येते त्यावेळी अटी, शर्ती व नको ते निकष लावून शेतकऱ्यांची अडवणूक करत असतात. या दरम्यान महाराष्ट्र शासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे.

आत्तापर्यंत विमा कंपनीच्या विरोधामध्ये आघाडी सरकारमधील एकाही मंत्र्याने स्पष्टीकरण दिलेले नाही, शेतकऱ्यांनी विमा भरलेला असून नुकसानीचे निकष स्पष्ट होत नाहीत.

तसेच कापूस, सोयाबीन, तुर, केळी, मोसंबी व इतर सर्व फळबाग तसेच शेततळे, पाझर तलाव फुटून शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. यामध्ये शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याशिवाय शेतकऱ्याचे अतिवृष्टी व ढगफुटीमुळे नुकसान होत आहे.

यामुळे सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना ७२ तासाच्या आत तात्काळ नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे असे घनसावंगी तालुक्यातील दैठणा (जि. जालना) गावाचे शेतकऱ्यांनी आमरण उपोषणात म्हटले आहे.

तसेच यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी म्हटले. या सर्व मागण्यासाठी  संपूर्ण गावातील शेतकरी आणि गावकरी दैठणा खुर्द शिवाजीनगर येथील हनुमान मंदिर सभाग्रहात अमरण उपोषणाला बसले आहेत.

जोपर्यंत शासनाकडून नुकसान भरपाईची व विमाकंपन्यांकडून विमा परताव्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालुच ठेवण्याचा निर्धार दैठणा येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. या उपोषणामध्ये महिलांसह लहान मुले हातात फलक घेऊन सहभागी झाले होते.

दैठणा येथील शेतकऱ्यांच्या मागण्या

सर्व खरीप, फळबाग पीकविमाबाबत सर्व अटी पंचनामे न करून आर्थिक मदत शासनाने करावी, जे रस्ते वाहून गेलेले आहेत त्याची कामे तात्काळ सुरू करावीत, अनेक शेततळे, पाझर तलाव फुटले आहेत त्यासाठी आर्थिक मदत करावी असा मागण्या केल्या आहेत.

शेतकऱ्यांना एक वर्षासाठी रेशन मोफत देणे, सर्व शिक्षण शुल्क माफ करणे, जास्तीच्या पावसाने मजुरावर उपास मारीची पाळी आली त्यांना २५ हजार रुपये प्रती कुटुंब मदत करणे, सर्व वीज बिल- शेतसारा माफ करणे, सरकारने जाहीर केलेली लाखाच्या वरची कर्ज माफी तात्काळ मंजूर करून सर्व शेतकऱ्यांना नव्याने कर्ज पुरवठा करण्यात यावा. अशा प्रकारच्या अनेक मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button