सलमान, रियाला सोडवणारे वकील शाहरुखच्या पोराची केस लढणार !

आर्यन खान
आर्यन खान
Published on
Updated on

मुंबईजवळ शनिवारी रात्री भरसमुद्रात 'कॉर्डेलिया द एम्प्रेस' या आलिशान क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकून रेव्ह पार्टी उधळली. या प्रकरणात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना अटक करण्यात आली. तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी मिळाली. या तिघांकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते.

अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) या कारवाईत मुनमुन धमीचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट आणि आर्यन खान यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली. एनसीबीच्या अधिकार्‍यांनी आर्यन खानची तब्बल चार तास चौकशी केली. त्यानंतर अरबाज आणि मुनमुन धमीचा यांच्यासह आर्यन खानला पोलिसांनी अटक केली.

सतीश मानेशिंदे : शाहरुखच्या मुलाची केस लढणार

मुलाच्या कारनाम्याने अडचणीत आल्यानंतर शाहरुख खानची पळापळ सुरु झाली आहे. पठाणचे शुटिंग थांबवून तो मुलगा आर्यनच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे. आर्यनची सुटका करण्यासाठी शाहरुखने बॉलिवूडमधील अनेक केसेस लढवणारे दिग्गज वकील सतीश माने शिंदे यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आजवर बॉलिवूडमधील अनेक हाय प्रोफाईल केसेस लढवल्या आहेत.

सतीश मानेशिंदे हे बॉलिवूडला अनेक केसेसमधून परिचित आहे. कारण त्यांनी यापूर्वी काळवीट प्रकरणात अडकलेला सलमान खान, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी संजय दत्त तसेच सुशांतच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली रिया चक्रवर्ती यांची बाजू मांडली आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील त्यांना हाय प्रोफाईल वकील म्हणूनच त्यांची ख्याती आहे. सतीश मानशिंदे हे कर्नाटकातील धारवाडचे रहिवाशी आहेत. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईला आले. त्यांनी 1983 मध्ये दिवंगत राम जेठमलानी यांचे कनिष्ठ वकील म्हणून सुरुवात केली, जे देशातील सर्वोच्च गुन्हेगारी वकीलांपैकी (क्रिमिनल लॉयर्स ) एक होते. 10 वर्षे त्यांनी राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली काम केले.

सतीश मानेशिंदे : यांची फी आहे तरी किती?

या दरम्यान, त्यांनी नागरी आणि गुन्हेगारी कायद्याचे बारकावे देखील समजून घेतले आणि नंतर राजकारण्यांशी तसेच अभिनेत्यांशी संबंधित केसेस हाताळल्या. मीडिया रिपोर्टनुसार, सतीश मानशिंदे एका सुनावणीसाठी 10 लाख रुपये घेतात. म्हणजेच त्यांच्याकडे रोजची 10 लाख रुपये फी आहे. जेव्हा रिया चक्रवर्तीने इतक्या महागड्या वकिलाला गाठले तेव्हा प्रश्न निर्माण झाला, की ती एवढे पैसे कोठून आणत आहे?

सतीश मानशिंदे यांनी ते आकारत असलेल्या फीवर एकदा प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी गेल्यावर्षी 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की ज्या आधारावर त्यांची फी 10 लाख सांगितली जात आहे ते प्रकरण 10 वर्ष जुने आहे आणि जर त्यांची फी त्यानुसार पाहिली गेली तर आजच्या तुलनेत ते खूप होईल. सतीश मानशिंदे यांनी असेही म्हटले होते की, ते आपल्या क्लायंटकडून घेत असलेल्या शुल्कामुळे कोणालाही त्रास होण्याची गरज नाही.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news