Stock Market Opening | सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला, अदानींसह IT शेअर्संना फटका | पुढारी

Stock Market Opening | सेन्सेक्स ३५० अंकांनी घसरला, अदानींसह IT शेअर्संना फटका

Stock Market Opening : भारत आणिे अमेरिकेतील जाहीर होणारा महागाई दर तसेच अदानी समूहाच्या वाढलेल्या अडचणी आदींमुळे शेअर बाजाराने आज सोमवारी (दि.१३) सावध सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी घसरला होता. दरम्यान, सकाळी १०.१५ च्या सुमारास सेन्सेक्स ३८७ अंकांनी घसरून ६०, २९५ वर होता. तर निफ्टी १०९ अंकांच्या घसरणीसह १७,७४७ वर व्यवहार होता. सुरुवातीच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण दिसून आली. १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांपैकी १० मध्ये घसरण झाली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था संथगतीने मार्गक्रमण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयटी शेअर्स सुमारे २ टक्क्याने खाली आले आहेत.

आयटीमध्ये कोफोर्ज (-६.१५ टक्के), पर्सिस्टंट सिस्टम्स लि. (-३.३५ टक्के), इन्फोसिस (-२.१९ टक्के), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लि. (-१.५९ टक्के), MphasiS (-१.५० टक्के), एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस (-१.२१ टक्के) हे शेअर्स घसरले.

सुरुवातीच्या व्यवहारात टाटा स्टील, पंजाब नॅशनल बँक हे शेअर्स ‍वधारले होते. अदानी ट्रान्समिशन, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन, अदानी पॉवर हे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून व्यवहार करत आहेत. (Stock Market Opening)

हे ही वाचा :

Back to top button