

मुंबई , पुढारी वृत्तसेवा: कार्यकारी अभियंत्यावर गोळीबार : मीरा भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खामबीट यांच्यावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
सुदैवाने ते यातून बचावले असून बांधकामाच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला असल्याची माहिती मिळते.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील ओंकारेश्वर मंदिर परिसरात काळ्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तीनी एका कारवर गोळीबार करून पळ काढला.
सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.
गोळीबाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकांसह वरिष्ठ अधिकारी आणि कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासात हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा :