‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, त्यांनी मुबंईला जावे….’ | पुढारी

‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल, त्यांनी मुबंईला जावे....’

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे दिशाहीन मिसाईल आहे. त्यांनी पंजाबच्या भल्यासाठी निमूटपणे मुंबईला जावे, अशी टीका शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीरसिंग बादल यांनी केली.

ते म्हणाले, ‘सिद्धू हे दिशाहीन मिसाईल असून त्यांना कुठे जायचे हेच माहीत नाही, हे मी आधीच सांगितले होते.

त्यांनी आधी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजकीय बळी घेतला आता पक्षाला अडचणीत आणले आहे.

नवज्योत सिद्धू अहंकारी माणूस आहे. ही गोष्ट सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे पंजाबला वाचवायचे असेल तर त्यांनी निमूटपणे मुबंईला निघून जावे.’

शिरोमणी अकाली दलाच्या या टिकेनंतर सर्वच पक्षांतून सिद्धूवर टीका होत आहे.

Bhavana Gawali : शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीकडून समन्स

हिंगोली : अतिवृष्टीने हाहाकार! सोयाबीनला कोंब फुटले

सिद्धूने प्रसिद्ध केला व्हिडिओ

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंबाजच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा चरजणजित सिंग चन्नी यांच्याकडे दिली होती. मात्र, चन्नी यांच्याशीही सिद्धू यांचे मतभेद झाले.

काही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि मंत्रिमंडळातील नेत्यांच्या समावेशावरून दोघांत तीव्र मतभेद झाल्याचे बोलले जात आहे. यातून त्यांनी राजीनामा दिला.

नवज्योत सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा भाजपप्रवेश पुढे ढकलला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणले आहे, ‘तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरुवात होते.

मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही.

सिद्धूने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, भ्रष्ट नेते आणि अधिकाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्तेची सूत्रे देणे हे पंजाबसाठी धोकादायक आहे.

मी कधी व्यक्तिगत लढाया कधी लढलो नाही. मी नेहमी मुद्द्यावंर लढाई केली आहे. मी त्याच्याशी कधीच तडजोड करणार नाही. मला पदाची लालसा कधीच नव्हती आणि नसेल.’

punjab crisis : ‘पंजाबमध्ये सध्या जे काही सुरु आहे, त्यामुळे केवळ पाकिस्तान खुश आहे’

नाशिक पाऊस : दीडशे क्विंटल कांद्यासह गहू भिजला, ४ लाखांचे नुकसान

मुख्यमंत्री म्हणाले, मार्ग निघेल

सिद्धू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वादातून मार्ग निघेल, असे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी पत्रकारांना सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button