नगर : विरोधकांनी भाजपचे श्रेय घेतले ; खासदार डॉ. सुजय विखे यांचा आमदार रोहित पवार यांच्यावर घणाघात

Published on
Updated on

जामखेड : पुढारी वृतसेवा :  भाजपने केलेल्या न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्याचे कामासाठी माजी मंत्री राम शिंदे व मी पाठपुरावा केला. तसेच जामखेड शहरातून जाणार्‍या 159 कोटींच्या रस्त्याच्या कामाच्या मंजुरीसाठी रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तो मंजूर केला. परंतु त्या कामाचे श्रेय विरोधक घेत असल्याचा घणाघात नगर दक्षिणचे खा. डॉ सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता केला. जामखेड येथील राज मंगलकार्यालयात पत्रकार दिनानिमित्त स्नेहसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री राम शिंदे, रवी सुरवसे, सोमनाथ पाचारणे, भाजपा युवा मोर्च्याचे अध्यक्ष शरद कार्ले, तुषार पवार, बिभीषण धनवडे, बंकट बारवकर, सलीम बागवान, रव प्रवीण सानप, मोहन गडदे, उदयसिंह पवार, अमित चिंतामणी, उमेश रोडे, ज्ञानेश्वर झेंडे, अंकुश ढवळे, महारुद्र महारनवर, गौतम कोल्हे, अरुण वराट, अल्ताफ शेख, उद्धव हुलगुंडे, विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व माजी मंत्री तथा आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
यप्रसंगी आमदार राम शिंदे म्हणाले कि, पत्रकारांनी देखील पत्रकारिता करताना सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. लोकशाहीमध्ये पत्रकारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे बातमीदारी करताना सत्य आणि वास्तविकता मांडली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा आमदार ः आ. शिंदे

राजकारण करत असताना दडपशाहीचे राजकारण विरोधकांनी गेल्या अडीच वर्षात केले. त्यामुळे कर्जत-जामखेडच्या जनतेला ते राजकारण रुचले नाही, म्हणून विरोधकांपेक्षा शिंदेच चांगले आहेत, असे मत मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा आमदार झालो आणि सरकार देखील आले आहे. त्यामुळे मतदार संघाचा विकास सुरु झाला असल्याचे मत आ. राम शिंदे यांनी व्यक्त केले.

2024 ला प्रधानमंत्री मोदीच ः खासदार विखे

लोकांनी 2024 ला ठरवलं आहे, देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीच होणार आहेत. विकासात्मक काम केल्याने लोकांच्या मनामध्ये पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच असणार आहे. त्यामुळे लोकांनी विकासाच्या मुद्यावर नरेंद्र मोदी यांना पहिली पसंती आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत पुन्हा नरेंद्र मोदीच प्रधानमंत्री होणार आहे, असा विश्वास नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news