Mumbai Metro : मेट्रो १ मार्ग उद्या पावणेदोन तासांसाठी राहणार बंद | पुढारी

Mumbai Metro : मेट्रो १ मार्ग उद्या पावणेदोन तासांसाठी राहणार बंद

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Mumbai Metro : घाटकोपर-वर्सोवा मेट्रो सेवा उद्या (दि.१९) पावणेसहा ते साडेसात या वेळेत बंद राहणार आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो २-अ आणि मेट्रो ७ च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव मेट्रो सेवा बंद राहणार आहे, असे मेट्रो १ च्या वतीने सांगण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मेट्रो २ -अ आणि मेट्रो ७ च्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम संध्याकाळी होणार आहे. मेट्रो १ ची सेवा पूर्वनियोजित सूचना देऊन बंद ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. रात्री साडेसात नंतर मेट्रो सेवा पुन्हा सुरू होणार आहे.

Back to top button