मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, ‘भाजपची साथ सोडली तरच….’ | पुढारी

मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, 'भाजपची साथ सोडली तरच....'

पुढारी ऑनलाईन डेस्क : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत उभय नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या भेटीत नेमकं काय झालं यावर प्रकाश आंबेडकर यांनी खुलासा केला आहे.एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत भेटीगाठी होत राहतील. प्रत्येक भेट राजकीयच असते हा संबंध बांधला जातो तो चुकीचा आहे. एकनाथ शिंदेनी भाजप सोडले तरच राजकीय चर्चा होऊ शकते. शिवसेना आणि वंचितची आघाडी होणार आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यंत्री शिंदे यांच्यात काल अडीच तास बैठक झाली होती. त्यांच्या भेटीनंतर राजकी वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीची भूमिका शिवसेनेबरोबर येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणूका लढवण्याची आहे. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. हा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांना माहित आहे. ज्या पक्षांसोबत भाजप आहे त्या पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडी कधीही गेला नाही. भाजप आणि त्यांचे मित्रपक्षांसोबत कोणताही समझोता करणार नाही. मुख्यमंत्री शिंदेनी भाजप सोडले तरच राजकीय चर्चा होऊ शकते, अन्यथा होऊ शकत नाही. याबाबत त्यांना आगोदरपासून माहित आहे, असे ते म्हणाले.

गेली ३५ वर्ष राजकारणात आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने खिमा केला म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो नाही. त्यावेळी भाजपसोबत गेलो असतो तर काँग्रेस राष्ट्रवादीचा आम्ही खिमा केला असता. शिवेसेनेसोबत समझोता करण्यास तयार आहे. शिवसेना आणि वंचितने एकमेकांना चार भिंतींच्या आत शब्द दिला आहे. पण जनतेसमोर भूमिका स्पष्ट केली आही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी भूमिका जाहीर करावी. उद्धव ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत पाहिजे आहे. त्यांना सोबत घेवून पत्रकार परिषद घेवू असे ते म्हणतात. पण माझ्याएवढे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला ओळखणारा नेता महाराष्ट्रात नाही. ते पक्ष फसवतील असे उद्धव ठाकरेंना सांगितले आहे. तरीही ते प्रयत्न करत असतील तर करूदेत. ठाकरे गट वंचितची आघाडी होणार अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली.

Back to top button