उद्धव ठाकरेंनी मुश्रीफांना वाचविण्याचा प्रयत्न केला; पण आता काऊंटडाऊन सुरू : किरीट सोमय्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हसन मुश्रीफांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. पण आता मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. भ्रष्टाचार करताना धर्म आठवत नव्हता का? भ्रष्टाचार करणारे माफिया मंत्री असतात, त्यांना जात धर्म नसतो. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
सोमय्या म्हणाले की, “हसन मुश्रीफांनी घोटाळ्याचे १५८ कोटी रूपये स्वत:च्या व नातेवाईकांच्या नावाने घेतले. कोलकत्याच्या बोगस कंपन्यांमधून पैसे आपल्या साखर कारखान्याकडे वळविले. पण कोल्हापूरच्या महालक्ष्मीने मला आशीर्वाद दिला आणि हसन मुश्रीफांचे काऊंटडाऊन सुरू झाले. आता सर्व घोटाळ्यांचा हिशोब घेऊनच राहणार. त्यांच्यावर फक्त आरोप केलेले नाहीत तर पुरावे दिले आहेत.
उद्धव ठाकरेंनी प्रकरण दाबले होते. २८ सप्टेंबरला कोल्हापूरला घोटाळे काढण्यासाठी जात होतो. पण मुश्रीफांनी जाऊ दिले नाही. महालक्ष्मीचे दर्शन घेऊ दिले नाही. आता सगळ्याचा हिशोब घेणार. पैसे घेताना, भ्रष्टाचार करताना धर्म आठवत नव्हता का? भ्रष्टाचार करणारे माफिया मंत्री असतात, त्यांना जात धर्म नसतो, तो घोटाळेबाज मंत्री असतो त्यांच्यावर कारवाई होणारच, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
- Hasan Mushrif Reaction : ईडी कारवाई नंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ED raids NCP leader Hasan Mushrif : हसन मुश्रीफ लढवय्ये नेते; दहशतीचे राजकारण जास्त काळ टिकत नाही : संजय राऊत
- ED raids Hasan Mushrif : महाराष्ट्रात सध्या ईडी सरकार कार्यरत -सुप्रिया सुळे