पुढारी ऑनलाइन डेस्क : माझ्यावर यापूर्वीही अशाच प्रकारचे छापे टाकण्यात आले होते. तेव्हा ही सर्व कागदपत्रे नेण्यात आली होती. मात्र, तेव्हाही कारवाईतून काहीही निष्पन्न झाले नव्हते. आता पुन्हा कशासाठी छापे टाकले माहित नाही. मात्र, असे असले तरी कार्यकर्त्यांनी शांतता राखावी माझ्यासाठी कोणीही दंगा करू नये, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले आहे. (Hasan Mushrif Reaction)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कागल विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील आणि पुण्यातील घरावर आज सकाळी 6 वाजता ईडीने छापे घातले. त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. (Hasan Mushrif Reaction)
मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे की, आम्ही कारवाईला सहकार्य करू. कृपया सर्वांनी शांत राहावे. अधिका-यांना आपले काम करू द्यावे. विशेष म्हणजे माझ्यासाठी कोणीही कोणत्याही प्रकारे कायदा मोडू नये. शांतता राखावी.
विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट (Hasan Mushrif Reaction)
तसेच यावेळी बोलताना हसन मुश्रीफ असेही म्हणाले की, हे अतिशय गलिच्छ प्रकारचे राजकारण सुरू आहे. विशिष्ट जाती धर्माच्या लोकांना टार्गेट केले जात आहे, अशी टीका देखील मुश्रीफ यांनी केली आहे.
हे ही वाचा :