मुंबई : कळवा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून पडून ‘पीएसआय’चा मृत्यू | पुढारी

मुंबई : कळवा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून पडून 'पीएसआय'चा मृत्यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा कळवा रेल्वे स्थानकात धावत्या लोकलमधून पडून शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मनोज भोसले (५७) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

शुक्रवार रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास कळवा रेल्वे स्थानकाजवळच लोकलमधून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानकातील रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना मिळाली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या घटनेची माहिती ठाणे रेल्वे पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासात मृत्यू प्रवाशाच्या पाकिटात मनोज भोसले नाव असलेले ओळखपत्र सापडले. या ओळखपत्रावरून ते पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. ठाणे रेल्वे पोलिसांनी पवई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, तसेच भोसले यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.

पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता दिवसपाळी करून कळवा येथील घरी जात होते. रात्री ९वाजून २० मिनिटांच्या सुमारास ते धावत्या जलद लोकलमधून प्लॅटफॉर्मवर उतरण्याच्या प्रयत्नात अंदाज चुकल्याने पडले. डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button