पुढारी ऑनलाईन डेस्क : वेगवान कारने तब्बल १३ किलोमीटर फरफटत नेल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. शरीरावर ४० गंभीर जखमा झाल्या असून तिचा मेंदू गायब झाला असल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, अंजलीच्या मृतदेहावर असा कोणताही भाग नाही जिथे तिला जखम झालेली नाही. (Kanjhawala Case)
शवविच्छेदन अहवालाच्या सुरूवातीला म्हटले आहे की, एका मुलीचा मृतदेह सफेद कपड्यात गुंडाळून आणण्यात आला होता. तिच्या शरीराच्या ३६ ठिकाणी ४० गंभीर जखमांच्या खुना आहेत. (Kanjhawala Case) कारने १३ किलोमीटर फरफटत नेल्याने अंजलीची अशी अवस्था झाली आहे. अहवालानुसार, अंजलीच्या शरीरावर ४० जखमा आहेत. तिचे डोके डोके फुटून मेंदू बाहेर आला होता.
शवविच्छेदन अहवालात सांगण्यात आले आहे की, अंजलीचा पाय फ्रॅक्चर झाला होता. तिचे संपूर्ण शरीर धूळ, मातीने भरलेले होते. तिचे फुफुस आणि बरगड्याही शरिराच्या बाहेर आल्या होत्या. (Kanjhawala Case) तिच्या प्रायव्हेट पार्टजवळ धूळ, माती आणि घाण आढळून आली. मात्र, जखमेच्या कोणत्याही खुना आढळून आल्या नाहीत. अंजलीचे दोन्ही गुडघे आणि पाय घासले गेले होते.
अहवालात जखमा, फरफटत नेल्याने झालेला रक्तस्त्रावाचा उल्लेख आहे. ज्यामुळे अंजलीचा मृत्यू झाला. मात्र अल्कहोल आढळल्याचा कोणताही उल्लेख नाही.
एफएसएल टीमच्या मतानुसार, सुरुवातीच्या तपासात हे समोर आले आहे की, अंजली कार खाली डाव्या बाजूस अडकली होती. एफएसएल टीमने म्हटले आहे की, कार खाली डाव्या बाजूस रक्ताचे डाग आढळून आले आहेत. कारच्या आतमध्ये असल्याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही. या प्रकरणातील आरोपींचे ब्लड सँपल तपासणीसाठी देण्यात आले आहेत. (Kanjhawala Case)