Tiger Attacks Circus Trainer : सर्कशीच्या लाईव्ह शो मध्ये वाघाने ट्रेनवरच चढवला हल्ला (VIDEO) | पुढारी

Tiger Attacks Circus Trainer : सर्कशीच्या लाईव्ह शो मध्ये वाघाने ट्रेनवरच चढवला हल्ला (VIDEO)

व्हेनिस (इटली); पुढारी ऑनलाईन : भारतात सर्कशीमध्ये प्राण्यांच्या वापरावर आणि प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. तेव्हा आपल्याकडे सर्कशीत प्राण्याचे खेळ पहायला मिळत नाही. पण, पुर्वी ते होत असे तेव्हा प्राण्यांची मनोरंजक कलाबाजी पाहण्यात वेगळाच आनंद मिळत होता. तसेच हिंस्त्र वन्य प्राण्यांना ट्रेनरच्या इशाऱ्यावर कर्तब करताना पाहण्याची नेहमी उत्सुकता असायची. भारतात जरी बंदी असली तरी परदेशातील सर्कशीमध्ये अद्याप वन्यप्राण्याचे वापर केला जातो. इटलीमध्ये अशाचा एक सर्कशीच्या ‘शो’ मध्ये वाघाने चक्क आपल्या प्रशिक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला असून तो पाहताना अंगावर शहारा येतो. (Tiger Attacks Circus Trainer)

इटलीच्या लेसे प्रांतात गुरुवारी सायंकाळी एका सर्कसचा ‘शो’ पार पडला. या लाईव्ह शो मध्ये वाघाने प्रशिक्षकावर हल्ला केला. याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. पिंजऱ्यामध्ये दोन तीन वाघांबरोबर प्रशिक्षक व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका वाघाला मोठया स्टुलवर उभारण्याचा आदेश प्रशिक्षकाने दिल्यावर तो वाघ फक्त प्रशिक्षकाकडे पहात होता. दोघेही डोळ्या डोळ घालून बघत आहेत आणि वाघ प्रशिक्षकाकडे पाहुन गुरगुरत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. प्रशिक्षक मोठ मोठ्याने त्याला सुचना देत आहे. इतक्यात खाली उभा असलेल्या दुसऱ्या वाघने प्रशिक्षकावर हल्ला केला. (Tiger Attacks Circus Trainer)

दुसऱ्या वाघाने प्रशिक्षकावर हल्लाकरुन त्याचा पाय पकडला. ते सोडविण्याचा व आरडा ओरडा करताना प्रशिक्षकाचा आवाज येताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पाय पकडलेल्या वाघ आक्रमकपणे प्रशिक्षकावर हल्ला करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. प्रशिक्षकावर हल्ला झाल्यावर प्रेक्षक सुद्धा घाबरल्याचे आणि तिथे धावपळ निर्माण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत. (Tiger Attacks Circus Trainer)

वाघाने मानेवर केला हल्ला (Tiger Attacks Circus Trainer)

प्रशिक्षक इव्हान आर्फेई हे ३१ वर्षाचे असून, एका वाघाला सुचना देताना दुसऱ्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. पहिल्यांदा वाघाने पायला धरले व त्यानंतर वाघाने प्रशिक्षकाच्या मानेला धरत मानेचा लचका तोडला. दुसऱ्या प्रशिक्षकाने प्रसंगावधान दाखवता चिडलेल्या वाघाला नियंत्रित केले व तेवढ्यात इव्हान यांनी स्वत:ची सुटका करुन घेत पिंजऱ्यातून पळ काढला.

हे सगळे दृश्य अंगावर शहारे आणणारे होते. या घटनेनंतर प्रेक्षक प्रंचड घाबरले होते, या घटनेचा अनेकांनी व्हिडिओ बनवला असून अनेकांनी ते आपल्या सोशल मीडिया अंकाउंटवरुन शेअर केला आहे. या हल्ल्यात प्रशिक्षक इव्हान गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या वीटो फाजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या सर्व घटनेनंतर सर्कसच्या व्यवस्थापकाची प्रतिक्रीया समोर आली आहे. सर्कसच्या व्यवस्थापकाने सांगितले की, प्रशिक्षक इव्हान आर्फेई अत्यंत कुशल आणि प्रोफेशनल आहे. तसेच वाघांना ट्रेन करण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. तो आमच्यासाठी खुप महत्त्वाचा आहे. अत्यंत अनाहुतपणे ही घटना घडली व ती नियंत्रित करण्यात सुद्धा आम्हाला यश आले. या हल्ल्यातून इव्हान सुखरुप बचावला ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला कोणताही धोका नाही. डॉक्टरांच्या देखरेकीखाली त्याच्यावर योग्य उपचार होत आहे. ताबा गमावलेल्या वाघाची प्राण्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाईल. तुर्तास त्या वाघाला इतर वाघांपासून वेगळे ठेवण्यात आले असल्याचे सर्कस व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले.


अधिक वाचा :

Back to top button