मविआ महामोर्चा : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी करा- शरद पवार | पुढारी

मविआ महामोर्चा : महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांची हकालपट्टी करा- शरद पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राचं खच्चीकरण, महापुरुषांचा अपमान, सीमाप्रश्नावरचा नेभळटपणा, शेतकऱ्यांविषयीची अनास्था, घटनाबाह्य सरकारच्या विरुद्ध आज महाविकास आघाडीने विराट महामोर्चा मुंबईत काढला. यावेळी सभास्थळावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जनतेला संबोधित केले. शरद पवार म्हणाले- ”महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आपण एकत्र एकवटलो आहोत. सामान्य माणसाच्या मनावर एक अखंड नाव आहे. संयुक्त महाराष्ट्रावेळी अनेक मोठे मोर्चे निघाले.

शरद पवार पुढे म्हणाले- ”छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र कधीच सहन करणार नाही, त्यांची हकालपट्टी करा. चंद्रकांत दादा यांच्या भीक विषयावरून पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधला. महापुरुषांविरुद्ध गलिच्छ शब्द वापऱ्यांना धडा शिकवावा लागेल.”

Back to top button