Sun Venus And Mercury Conjunction 2022 : लवकरच सूर्य-बूध-शुक्राची युती, या राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार | पुढारी

Sun Venus And Mercury Conjunction 2022 : लवकरच सूर्य-बूध-शुक्राची युती, या राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

पुढारी ऑनलाइन डेस्क : Sun Venus And Mercury Conjunction 2022 : वैदिक ज्योतिषनुसार, ग्रहांची युति ही मोठी प्रभावी असते. वेगवेगळ्या ग्रहांची वेगवेगळ्या राशीत होणारी युती मोठे शुभ-अशुभ फळ घेऊन येते. अशीच एक युती लवकरच होत आहे. जी काही राशीतील लोकांसाठी खूप धनसंपदा देणारी ठरणार आहे. ही युती धनू राशीत होणार असून ती 14 दिवसांसाठी आहे.

Sun Venus And Mercury Conjunction 2022 : सध्या बुध आणि शुक्राची युती आहे. येत्या 16 डिसेंबरला सूर्य धनू राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 16 डिसेंबरला सूर्याची आधीपासूनच युती असलेल्या बूध आणि शुक्रासोबत युती होणार आहे. बुध हा 28 डिसेंबरला तर शुक्र हा 29 डिसेंबरला मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 16 ते 28 डिसेंबर दरम्यान सूर्य-बुध आणि शुक्राची युती होणार आहे. या युतिमुळ लक्ष्मी योग आणि बुध आदित्य योग बनणार आहे. त्यामुळे या त्रिग्रह युतीमुळे या तीन राशींच्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊ या या राशी कोणत्या आहेत…

Sun Venus And Mercury Conjunction 2022 : मेष राशी – मेष राशींच्या व्यक्तींसाठी हा योग त्यांच्या भाग्य स्थानात आहे. धन आणि पंचम भावाच्या स्वामीमुळे भाग्यात युती मुळे तुम्हाला शेअर बाजारमध्ये मोठा धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला नवीन व्यवसाय काम सुरू करायचे असेल तर तुम्हाला कुटुंबाचे मोठे सहकार्य लाभेल. त्या सोबतच या राशीच्या व्यक्तींसाठी आणखी एक आनंदाची बातमी अशी की त्यांच्या प्रेम विवाहासाठी त्यांचे कुटुंबीय तयार होतील. त्यांच्या विवाहासाठी मंजुरी मिळेल. नोकरीत प्रमोशन मिळेल. खूप दिवसांपासून प्रयत्न करून ही न मिळालेले लोन मिळेल.

Sun Venus And Mercury Conjunction 2022 : सिंह राशी – या राशीच्या व्यक्तिंसाठी हा योग त्यांच्या पंचम स्थानाने प्रभावी आहे. यावेळी तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल. तुम्हाला चोहीकडून धन लाभ होण्याचे योग दिसत आहे. तर सरकारी नोकरदारांना उच्च पद मिळू शकते. तर नवीन कार्य सुरू करण्यासाठी धन मिळेल. व्यापारी वर्गाला मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. तर मीडिया, लेखन आणि सिनेमा क्षेत्रात कार्यरत लोकांना मोठी प्रसिद्धी मिळेल.

Sun Venus And Mercury Conjunction 2022 : धनू राशी – या राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग लग्नस्थळात बनत आहे. त्यामुळे भाग्य, दशम, आणि लाभ भावााचे स्वामी आहे त्यात लग्नात ही युती असल्याने तुम्हाला धन लाभासह अन्य सर्व बाबतीत प्रगती आणि सौख्य लाभेल. या राशीच्या व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत धार्मिक यात्रा किंवा पर्यटनाला जातील. तर पत्नीचे संपूर्ण सहयोग मिळून पत्नीसोबत खूप छान काळ व्यतीत कराल. ज्या व्यक्ती जनसंचार आणि सौंदर्य प्रसाधन व्यवसायात आहे त्यांना मोठा लाभ संभवतो.

हेही वाचा :

Back to top button