मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पोलिसांत दिलेली तक्रार दखलपात्र असतानाही गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात अखेर कायदेशीर कर्तव्य टाळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने माटुंगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
माटुंगा (पूर्व) परिसरात रहात असलेले यातील ४२ वर्षीय तक्रारदार हे सेल्समन आहेत. त्यांनी गेल्यावर्षी ०२ सप्टेंबर रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात जात एक तक्रार दिली होती. यावेळी ४० वर्षीय पोलीस उपनिरीक्षक हे माटुंगा पोलीस ठाण्यात ड्युटी अधिकारी होते. तक्रारदार यांनी दिलेली तक्रार दखलपात्र असतानाही या पोलीस उपनिरीक्षकाने गुन्हा दाखल केला नाही.
अखेर तक्रारदार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार माटुंगा पोलिसांनी तक्रारदार यांची फिर्याद नोंदवून घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेला पोलीस उपनिरीक्षक हा सध्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत असून याप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
.हेही वाचा