धक्कादायक! पुणे रेल्वे स्थानकावरून अडीच वर्षाच्या बालकाचे अपहरण | पुढारी

धक्कादायक! पुणे रेल्वे स्थानकावरून अडीच वर्षाच्या बालकाचे अपहरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  शहरात एकीकडे अपहरणांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना वर्दळीच्या असलेल्या पुणे रेल्वे स्थानकातून अडीच वर्षाच्या बालकाचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अपहरण झाल्यापासून पोलिस पथके बालकाच्‍या शोध घेण्‍यासाठी रवाना झाली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात मजूरी करणार्‍या एक दाम्पत्य त्यांच्या मुळगावी झारखंड येथे जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आले होते. दाम्पत्याबरोबर त्यांचा अडीच वर्षाचा चिमुरडाही होता. यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील सरकत्या जिन्यालगत ते रात्री साडे-आठ वाजण्याच्या सुमारास हावडा एक्सप्रेसने झारखंडला जाणार होते.

दरम्‍यान, एक महिला व एक पुरूष त्यांच्या जवळ आले. त्यांच्याशी गप्पा मारू लागले. महिलेने तिच्याजवळील खाऊ मुलाला खाण्यास दिला. यादरम्यान मुलाबद्दल आपल्याला जिव्हाळा आहे, असे दाखवून ते दोघे त्या बाळाला खाऊ आणतो म्हणून घेऊन गेले. त्यांची बराचवेळ वाट पाहूनही ते परत आले नाही. मुलाच्या आई-वडीलांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पुणे रेल्वे पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला. चिमुरडा सापडला नाही. त्यामुळे त्याच्या आई-वडीलांनी रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा  : 

 

Back to top button