चंद्रकांत पाटील यांनी ‘त्या’ वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी | पुढारी

चंद्रकांत पाटील यांनी 'त्या' वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

औरंगाबाद, पुढारी वृत्‍तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी भीक मागून शाळा काढल्या या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांच्याबद्दलचा आदर मला कोणी शिकविण्याची गरज नाही. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करताना संघर्ष झाला त्यावेळी मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा राष्ट्रीय महामंत्री होतो. त्या वेळी गावोगावी संवाद यात्रा काढून लोकांना समजावून सांगितले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम मूर्ती भेट देऊन तेव्हा माझा सन्मान झाला होता. बाबासाहेबांबद्‌दल मी जेवढे वाचले तेवढे टीका करणाऱ्यांनी वाचले नसावे. बाबासाहेब, महात्मा फुले यांच्याबद्दल माझ्या मनात नुसता आदर नाही तर श्रद्धा आहे.

भीक मागून त्यांनी शाळा उभारल्या असे मी म्हणालो परंतु त्याकाळी भीक मागणे हा प्रचलित शब्द होता. परंतु भीक या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

.हेही वाचा  

पिंपरी : सांगवीत शुक्रवारपासून रंगणार ‘पवनाथडी’ ; महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती

पिंपरी : शालेय पोषण आहार पोटात नाही तर कचऱ्याच्या डब्यात

सातारा : दगडी पाटा डोक्यात घालून पत्नीचा खून

Back to top button