

वर्षा कांबळे :
पुढारी प्रतिनिधी : पिंपरी : सुदृढ पिढी निर्माण करण्यासाठी पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात येतो. मात्र, बचत गटांतर्फे देण्यात येणार्या शालेय पोषण आहाराचा दर्जा इतका निकृष्ट आहे की, हा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या पोटात न जाता थेट कचर्याच्या डब्यामध्ये जात आहे.खट टाकलेली खिचडी वाटप केली जाते, त्यामुळे विद्यार्थी पोषण आहार खात नाही.शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जाते.
कोविड -19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता करावयाच्या उपाययोजनाासाठी मार्च 2020 पासून शाळास्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात होता. यानंतर 15 मार्च 2022 पासून राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या शाळांची स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेचा कालावधी निश्चित करून त्यानुसार शालेय पोषण आहार शाळा स्तरावर देण्याची अंमलबजावणी केली जात आहे.
बचत गटांकडून देण्यात येणारा शालेय पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा असल्याने विद्यार्थी तो नीट खात नाहीत. परिणामी डब्यात घेतलेला आहार हा कचर्याच्या डब्यामध्ये टाकला जातो.
शालेय पोषण आहाराचे प्रत्येक दिवशी काय द्यायचे याचे वेळापत्रक ठरलेले आहे. त्यानुसार, अनुक्रमे खिचडी, आमटी भात, मसालेभात आणि शनिवारी कोरडा खाऊ यामध्ये राजगिरा लाडू असा आहार पुरविला जातो. तसेच, देण्यात येणार्या खिचडी व आमटी भातामध्ये ठराविक भाज्या व मिश्र कडधान्य देणे गरजेचे आहे, असे असताना विद्यार्थ्यांना एकाच कडधान्याची पातळ आमटी व हळद आणि ति
खिचडीत आढळल्या होत्या अळ्या
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या 105 शाळांमधील जवळपास 40 हजार मुलांना आणि खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना हा तयार आहार पुरविला जातो. मागच्याच महिन्यामध्ये एका बचत गटाकडून विद्यार्थ्यांच्या खिचडीमध्ये अळ्या आढळल्यानंतर त्या बचतगटाला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले आहे.
ठेकेदाराचेच होतेय पोषण
शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत आहार शिजविण्याचे काम महिला बचत गट, गरजू महिला तसेच स्वयंसेवी संस्था यांच्याकडून केले जाते.