पिंपरी : सांगवीत शुक्रवारपासून रंगणार ‘पवनाथडी’ ; महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती

पिंपरी : सांगवीत शुक्रवारपासून रंगणार ‘पवनाथडी’ ; महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती
Published on
Updated on

पिंपरी : महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर शुक्रवार (दि.16) ते मंगळवार (दि.20) असे पाच दिवस पवनाथडी जत्रा आयोजित केली आहे. महाराष्ट्राची संस्कृती व शहराच्या परंपरा यांची सांगड घालून या जत्रेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.9) दिली. पवनाथडी जत्रेत वस्तू विक्री व प्रदर्शनासाठी स्टॉल उपलब्ध व्हावेत यासाठी बचत गटांच्या प्रतिनिधींनी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. सुमारे आठशे बचत गटांना स्टॉल्स उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. मर्यादेपेक्षा अधिक अर्ज आल्यास सोडत पद्धतीने स्टॉल्सचे वाटप करण्यात येणार आहे. यंदा दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत.

पालिकेच्या वतीने सन 2007-08 या वर्षापासून पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दरवर्षी अशाप्रकारे पवनाथडी जत्रा भरवण्यात आली. मात्र, कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात जत्रेचे आयोजन करण्यात आले नाही.
बचत गट व वैयक्तिक महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्य विकसित व्हावे यासाठी जत्रा प्रभावी माध्यम ठरले आहे. यामध्ये महिला बचत गटांसाठी विक्री प्रदर्शनासाठी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात येतात. जत्रेमध्ये सहभागी होणार्‍या गटांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्टॉल्स मध्ये विविध उत्पादित वस्तू, खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शने मांडण्यात आहेत. जत्रेत तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते, असे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले.

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑर्केस्ट्रा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळींची जुगलबंदी, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक लोककलांचे सादरीकरण लोककलाकार करतील. पाच दिवस चालणार्‍या या जत्रेमध्ये सुमारे तीन ते पाच लाख लोक भेट देतील असा अंदाज आह

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news