महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संसदेत पडसाद उमटण्याची शक्यता | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर संसदेत पडसाद उमटण्याची शक्यता

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : संसदेचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून (दि.७) सुरू होणार आहे. परंतु, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्या गटाचे खासदार संसदेत यासंबंधी आवाज उठवण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षण वेदिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. अशात सीमावादावर दिल्लीतही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून सीमावादासंबंधी शहा यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे कळतेय. तर, ठाकरे गटाकडून यासंबंधी हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. कर्नाटकचे खासदार देखील सीमामुद्द्यावर आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून देखील यासंबंधीचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button