Pigeon Meat : मुंबईतील रहिवाशांनी रेस्टॉरंटला पुरवले कबुतराचे मांस; आठ जणांना अटक | पुढारी

Pigeon Meat : मुंबईतील रहिवाशांनी रेस्टॉरंटला पुरवले कबुतराचे मांस; आठ जणांना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतीच एक विचित्र घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील एका रहिवाशाने कबूतर मारून त्याचे मांस (Pigeon Meat) जवळच्या रेस्टॉरंटमध्ये विकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अभिषेक सावंत आणि माटुंगा पूर्व येथील नरोतम निवास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सात सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनुसार, सावंत या वर्षी मार्च महिन्यापासून अपार्टमेंटच्या टेरेसवर पिंजऱ्यात कबुतर पाळत होते. त्यानंतर त्यांनी पक्षी मोठे झाल्यावर मारले आणि त्यांना हाऊसिंग सोसायटीच्या अगदी खाली असलेल्या हॉटेलला चिकन (Pigeon Meat) म्हणून विकले.त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे ७१ वर्षीय सेवानिवृत्त लष्करी जवान हरेश गगलानी यांनी पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर सावंत आणि इतरांवर अनेक आयपीसी कलमांसह ४२८ प्राण्यांना मारणे किंवा त्यांना अपंग करणे आणि ४४७ कलमाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये एका राजकारण्याचा मुलाचा समावेश आहे.

गगलानी यांनी केलेले आरोप गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी मात्र फेटाळून लावले आहेत. त्यांनी दावा केला की, निवृत्त लष्करी जवान अनेक दिवसांपासून असे खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. “गगलानी यांना खोटे आणि फालतू खटले दाखल करण्यात आनंद वाटतो. त्यांनी आतापर्यंत ३४ खटले दाखल केले आहेत. या प्रकरणी हॉटेल मालकानेही हे दावे फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा;

Back to top button