मोठी बातमी – एअर इंडिया आणि विस्ताराचे लवकरच विलीनीकरण | Merger of Air India and Vistara | पुढारी

मोठी बातमी - एअर इंडिया आणि विस्ताराचे लवकरच विलीनीकरण | Merger of Air India and Vistara

एअर इंडिया आणि विस्ताराचे लवकरच विलीनीकरण

पुढारी ऑनलाईन – एअर इंडिया आणि विस्ताराचे मार्च २०२४पर्यंत विलीनीकरण होणार आहे. या व्यवहारानंतर एअर इंडियाच्या विस्तारित समूहात सिंगापूर एअरलाईन्सला या कंपनीत २५.१ टक्के इतका वाटा मिळेल. त्यासाठी सिंगापूर एअरलाइन्स २०५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Merger of Air India and Vistara)

टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्स यांनी २०१३ला भारतात विस्तारची सुरुवात केली होती. एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनकरणानंतर सिंगापूर एअरलाईन्सचे भारतात मोठी संधी मिळणार आहे.

एअर इंडियाच्या विस्तारित समूहात एअर इंडिया, विस्तारा, एअर एशिया, एअर इंडिया एक्सप्रेस यांचा समावेश असेल. एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर एशियाच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आधीच सुरू झालेली आहे, या विलीनीकरणातून कमी दरातील विमानसेवा उपलब्ध केली जाणार आहे.

एअर एशिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाबद्दलची माहिती टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्सने केली आहे.

हेही वाचा

Back to top button