वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, याचे पुरावे माझ्याकडे : आदित्य ठाकरे | पुढारी

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, याचे पुरावे माझ्याकडे : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, याचे पुरावे माझ्याकडे आहेत. कोणत्या बैठकीनंतर हा प्रकल्प बाहेर गेला. या बैठकीबाबत मुख्यमंत्र्यांना माहित होते का ? असा सवाल करून याबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर माझ्याशी बोलावे, असे थेट आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (दि. २९) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. ते  पत्रकार परिषदेत बोलत होते.

वेदांता प्रकल्पाबाबत करार झालेला असताना हा प्रकल्प ऐन निवडणुकीच्या काळात गुजरातला कसा गेला, असा सवाल करून आदित्य ठाकरे यांनी ५ सप्टेंबर २०२२ ला एमआयडीसीकडून वेदांताच्या अनिल अग्रवाल यांना दिलेले पत्र दाखवले. तसेच या पत्राचे त्यांनी वाचन केले. प्रकल्प बाहेर जाता असताना खोके सरकार खोटं का बोलत आहेत, वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये का गेला, राज्यातील लाखो लोकांचा रोजगार का गेला, याबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी त्‍यांनी केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आंदोलनाशी काही संबंध नाही. त्यांच्यावर एकही केस दाखल नाही, अशी टीका मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात केली होती. या टीकेला माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही आंदोलन करतो, तेव्हा आम्हाला शेंबडी पोरं बोलले जाते.

घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून गोळाबार करणाऱ्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. कृषीमंत्री महिला खासदारांना शिवीगाळ करत आहेत. दादरमध्ये गोळीबार करणाऱ्यावर सरकारकडून कारवाई होत नाही, असा आरोपही ठाकरे यांनी या वेळी केला. महाविकास आघाडी सरकारने मागील अडीच वर्षात केलेल्या कामाचे श्रेय शिंदे सरकार घेत आहे. सध्या राज्यात मस्ती सुरू आहे, अशीही टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button