महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुजरातच्या प्रचारात व्यस्त; आधी प्रकल्प आता मंत्रिमंडळ पाठवले : आदित्य ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्रिमंडळाची आज बैठक होती ती रद्द करण्यात आली आहे. खोके सरकारच्या मंत्रिमंडळाला महाराष्ट्रासाठी बैठक घेण्याकरिता एक तास वेळ नाही. सर्वजण गुजरात निवडणुकीत व्यस्त आहेत. आधी आमदार पाठवले, नंतर प्रकल्प पाठवले, आता मंत्रिमंडळ पाठवले आहे. अशी टीका युवासेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यासाठी मातोश्रीवरून रवाना झाले. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गुजरातच्या प्रचारात व्यस्त आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रासाठी वेळ देणे गरजेच आहे. प्रचार झाला पाहिजे तो सर्व पक्षांना अधिकार आहे. पण राज्यातील प्रश्नांसाठी आजची कॅबिनेटची बैठकही महत्वाची होती, असे ते म्हणाले. जे राज्यपाल महाराष्ट्राचे असूनही महाराष्ट्राचाच अपमान करतात आणि त्यांनाच पाठीशी घालणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायची. याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. तसेच पुढे काय कारवाई होणार हे त्यांनी सांगावे, असेही ते म्हणाले. दरम्यान बिहार दौऱ्यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Rahul Gandhi letter : राहुल गांधी यांचे महाराष्ट्राला पत्र : “छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र…”
- Earthquake : तुर्कस्तानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप, 35 जखमी
- सत्येंद्र जैन तुरुंगात नाही रिसॉर्टमध्ये – तुरुंगात जैन यांना व्हीव्हीआयपी सुविधा, भाजपचा आरोप