पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कस्तानमध्ये आज बुधवारी सकाळी 6.1 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. प्राथमिक माहितीनुसार 35 जण या भूकंपात जखमी झाले आहे. मात्र, अद्याप मृत्यूचे वृत्त नाही.
तुर्कस्तानमध्ये आज बुधवारी पहाटे देशाच्या वायव्येला आणि राजधानी इस्तंबूलच्या पूर्वेला सुमारे 170 किमी (105 मैल) अंतरावर उथळ भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय अधिका-यांनी सांगितले की भूकंपाची तीव्रता 5.9 होती. तर यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या 6.1 पेक्षा कमी होती. आणि त्याचा केंद्रबिंदू डुझे प्रांतातील गोलयाका जिल्ह्यात होता. मात्र जवळील अन्य शहरांनाही भूकंपाचे हादरे जाणवले.
याबाबत आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी ट्विट केले की, 35 जण जखमी झाले असून यात 32 जणांचा समावेश आहे, ज्यामध्ये डुझसे, एक इस्तंबूल आणि इतर दोन जवळच्या बोलू आणि झोंगुलडाक प्रांतात आहेत.
गोल्याकाला भेट देणारे गृहमंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले की, घाबरून बाल्कनीतून उडी मारल्याने एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली आहे. ते म्हणाले की 70 आफ्टरशॉक नोंदवले गेले आहेत.
भूकंपाचे धक्के जाणवताच लोक पहाटेच्या वेळी त्यांच्या घराबाहेर ब्लँकेटने झाकलेले दिसले. काहीजण बाहेर जमिनीवर ब्लंकेट ठेवताना आणि उब मिळवण्यासाठी शेकोटी पेटवताना दिले.
दरम्यान, भूकंपामुळे डुझसे आणि सक्रिया प्रांता बुधवारी शाळा बंद राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिका-यांनी सांगितले. तर नॅशनल डिझास्टर एजन्सीने रहिवाशांना घाबरू नका, असे आवाहन केले आहे.
नागरिक फातमा कोलाक यांनी एएफपीला सांगितले की, आम्ही मोठ्या आवाजाने आणि हाद-यांनी जाके झालो, आम्ही घाबरून आमच्या घरातून बाहेर पडलो आणि आता आम्ही बाहेर वाट पाहत आहोत.
हे ही वाचा :