मुख्यमंत्री व ४० आमदारांनी राजीनामा द्यावा; …नाहीतर जोडे कसे मारले जातात ते शिवसेना दाखवेल : संजय राऊत | पुढारी

मुख्यमंत्री व ४० आमदारांनी राजीनामा द्यावा; ...नाहीतर जोडे कसे मारले जातात ते शिवसेना दाखवेल : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाकडे पाच वेळेस माफी मागितली असल्याचे म्हटले. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा निषेध करून  त्यांच्यासह ४० आमदारांनी राजीनामा द्यावा. तसेच महाराष्ट्र सरकारकडून राज्यपालांना हटविण्याची अधिकृत मागणी यायला पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात, आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

राऊत पुढे म्हणाले की, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दळभद्री वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा दुखावला आहे. तसेच भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ५ वेळा माफी मागितली, असे विधान केले. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? वारंवार शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फूले, छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला जात आहे. शिवाजी महाराजांनी ५ वेळा कधी माफी मागितली, हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. कारण, ते भारतीय जनता पक्षाचे सहयोगी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या संदर्भात रस्त्यावर उतरलात स्वागत आहे, जोडे मारलेत स्वागत आहे. पण आता जोडे कोणाला मारणार? असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.

हेही वाचा :

Back to top button