गजानन किर्तीकरांच्या स्वरूपात अनुभवी नेता लाभला, आव्हाडांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

गजानन किर्तीकरांच्या स्वरूपात अनुभवी नेता लाभला, आव्हाडांच्या कारवाईत राजकीय हस्तक्षेप नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : जितेंद्र आव्हाड यांच्या कारवाईत कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही, पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे, तसेच गजानन किर्तीकरांच्या स्वरूपात आम्हाला अनुभवी नेता लाभला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे आज भंडारा दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, गजानन किर्तीकर वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्याकडे अनेक वर्षांच्या विकास कामांचा अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाचा बाळासाहेबांची शिवेसनेला फायदा होणार आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईत केली आहे. त्याच्यामध्ये कोणताही राजकिय हस्तक्षेप नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार हे कामांना प्राधान्य देते. गेल्या तीन महिन्यात अनेक वर्षांच्या प्रलंबित कामांना चालना देण्याचं काम सरकारने केले आहे. नागपूर ते शिर्डी समृद्धी हायवे पूर्ण तयार आहे आणि लवकरच त्याचे लोकार्पण होईल. असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button