

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे रतन बोडके या शेतकऱ्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. बंदुकीचा धाक दाखवून 14 ते 15 लाख रुपयांचा ऐवज लुटून नेला असून आज आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. 14 वर्षाच्या मुलीच्या डोक्याला बंदूक लावून सहा ते सात दरोडेखोरांनी ही लूट केली. या घटनेने परिसरात घबराट पसरली आहे.
बोडके यांच्या घरात सुमारे 80 ते 85 तोळे सोने होते. यातून साधारणतः 60 ते 70 तोळे सोने चोरी गेल्याची माहिती मिळत आहे. यात सहा जण चोर असून, तिघा जणांकडे बंदूक असल्याने लहान मुलांना बंदुकीचा धाक दाखवून संपूर्ण दरोडा टाकल्याची माहिती समोर येत आहे. घराला सीसीटीव्ही बसवल्याची माहिती चोरांना समजताच त्यांनी सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क देखील चोरून नेल्याची माहिती घरमालकांनी दिली आहे. घरमालकांची क्रेटा गाडीदेखीलचोरांनी लंपास केली आहे. दिंडोरी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा सुरू आहे.