Patra Chawl land scam case : संजय राऊतांना मोठा दिलासा, पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजूर

 Patra Chawl land scam case : संजय राऊतांना मोठा दिलासा, पत्राचाळ प्रकरणात जामीन मंजूर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनी लाँड्रिंग प्रकरणात आज विशेष पीएमएलए न्यायालयाने राज्यसभा खासदार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत पत्राचाळ ( Patra Chawl land scam case) गैरव्यवहार प्रकरणी सुमारे शंभर दिवसांपासून आर्थर रोड कारागृहात आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज (दि.९, बुधवार) सुनावणी झाली. पण संजय राऊत यांच्या जामीनाला ईडीने विरोध केला आहे. ईडी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. राऊत यांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. दरम्यान, संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर झाला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना गोरेगाव येथील  पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) रवानगी करण्यात आली होती. गेले १०० दिवस ते आर्थर रोड कारागृहात आहेत. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सहभाग असल्याचा आरोप केला आहे. राऊतांच्या वकिलांनी पत्राचाळ घोटाळ्याशी त्यांचा काही संबंध नाही नसल्याचा युक्तीवाद केला.  

 Patra Chawl case: काय आहे 'ईडी'चा आरोप

ईडीने (ED- Enforcement Directorate) संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी  गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केली होती. ईडीचा राऊत यांच्यावर असा आरोप आहे की,  संजय राऊतांचे भाऊ प्रवीण राऊत (Pravin Raut) हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. तेव्हा प्रवीण यांना एचडीआयएल ग्रुपकडून (HDIL) ११२ कोटी रुपये मिळाले होते. या ११२ कोटी मधील १ कोटी ६ लाख रुपये हे राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यावर पाठवण्यात आले. या पैशांनी त्यांनी अलिबाग येथे जमीन खरेदी केली. त्याचबरोबर पत्राचाळ डेव्हलेपमेंटमध्ये प्रवीण राऊत हे फक्त नाममात्र होते; पण सर्व व्‍यवहार संजय राऊत पाहत होते, असेही ईडीने म्हटले आहे. ( Patra Chawl land scam case)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news