पिंपरी : पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे यांची बदली, रिक्त जागी उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील यांची नियुक्ती | पुढारी

पिंपरी : पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे यांची बदली, रिक्त जागी उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील यांची नियुक्ती

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयात कार्यरत असलेले पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागी उपायुक्त स्वप्ना गोरे आणि विवेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सोमवारी (दि.7) रात्री गृह विभागाने आदेश जारी केले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी रात्री राज्यातील पोलिस अधीक्षक, उपायुक्त दर्जाच्या 104 अधिकार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पिंपरी- चिंचवड आयुक्तालयातील परिमंडळ एकचे पोलिस आयुक्त मंचक इप्पर यांची नाशिक येथे गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस अधीक्षकपदी तर परिमंडळ दोनचे उपायुक्त आनंद भोईटे यांची बारामती (पुणे ग्रामीण) येथे अप्पर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

उपायुक्त आनंद भोईटे आणि मंचक इप्पर यांच्या रिक्त झालेल्या जागी उपायुक्त स्वप्ना गोरे, विवेक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्वप्ना गोरे या सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य पदावर तर, विवेक पाटील हे पुणे पोलिस आयुक्तालयात उपायुक्त पदावर कार्यरत होते.

Back to top button