Chennai Rain : चेन्नईमध्ये ३० वर्षातील सर्वाधिक पाऊसाची नोंद; पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

Chennai Rain : चेन्नईमध्ये ३० वर्षातील सर्वाधिक पाऊसाची नोंद; पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेन्नईमध्ये मंगळवारी 8.4cm पावसाची नोंद झाली, ज्यामुळे दक्षिणेकडील शहरामध्ये 30 वर्षांतील सर्वाधिक पाऊस पडला असल्याचे सांगितले जात आहे. तामिळनाडूची राजधानी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने झोडपले आहे. रात्रभर पावसाच्या सरी कोसळल्यामुळे रस्ते जलमय झाले. पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

चेन्नईसह संपूर्ण राज्यभरामध्ये मंगळवारी (दि. १) मुसळधार पाऊस झाला. चेन्नईमधील पूर नियंत्रित कक्षाकडून या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेतले असल्याचे सांगण्यात आले आहे. रेड झोन असणाऱ्या भागामध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (Chennai Rain)

मंगळवारी सुरू असलेल्या पावसामुळे चेन्नईतील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यावरील सर्व वाहतूक विस्कळीत झाले आहे. काही बसेस पावसामुळे अडकून पडल्या आहेत. तर काही ठीकाणी रस्त्यांवर झाडे पडली असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सर्व यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. (Chennai Rain)

हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानूसार, तमिळनाडू आणि पदुच्चेरी भागामध्ये शुक्रवारपर्यंत पाऊस असणार आहे. मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सचिवालयात राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत बैठक बोलावली आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news