कर्मचारी कपातीबद्दल Byjusच्या सीईओंचा माफीनामा | पुढारी

कर्मचारी कपातीबद्दल Byjusच्या सीईओंचा माफीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बायजूने त्यांच्या विभागातील ५०,००० कर्मचार्‍यांपैकी ५ टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केली होती. बायजूने कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची प्रक्रिया देखील सध्या सुरू केली आहे. ज्या कर्मचार्‍यांना कामावरून काढले जात आहे त्यांना १५ दिवसांचा नोटिस कालावधी दिला गेला आहे. कामावरून कमी करण्याच्या या निर्णयानंतर आता बायजूचे संस्थापक बायजू रवींद्रन यांनी केलेल्या ईमेलची सध्या जोरदार चर्चा आहे. या ईमेलमधून त्यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागीतली आहे. byjus Raveendran Email

सीईओ बायजू रवींद्रन यांनी केलेल्या ईमेलची प्रत त्यांनी माध्यमांकडे दिली. बायजू रविंद्रन यांनी केलेल्या ईमेलमध्ये त्यांनी ज्या कर्मचार्‍यांना कामावरून काढले जात आहे त्यांची माफी मागितली आहे. त्यांनी हे कबूल केले आहे की, कंपनी बर्‍याच कर्मचार्‍यांना सोडून देत आहे. ते या ईमेलमध्ये म्हणाले की, मी याबाबत खरोखर दिलगीरी व्यक्त करत आहे, पण माझा नाईलाज आहे. सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीला हा मोठा निर्णय घेण्यास भाग पडले आहे. byjus Raveendran Email

सीईओ बायजू रवींद्रन यांनी केलेला ईमेल

प्रिय कंपनी सदस्य,
गेल्या काही आठवड्यांमध्ये, तुम्ही आपल्या कंपनीतील बदलांच्या योजना पाहत असाल किंवा ऐकत असाल. तुमच्यापैकी काहीजण याच्या विरोधात असतील किंवा कदाचित याबद्दल गोंधळलेले देखील असतील. म्हणून, मी तुम्हाला लिहित आहे जेणेकरून आम्ही काय करत आहोत, आम्ही ते का करत आहोत आणि मला त्याबद्दल कसे वाटते हे तुम्ही थेट माझ्याकडून ऐकायला मिळेल.

हेही वाचा

Back to top button