CM Eknath Shinde
CM Eknath Shinde

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट स्थापन

Published on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशीनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या कार्यगटाच्या सदस्यांमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्य स्तरावरील सर्व शिक्षण संस्था आणि विभागांना पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षण संस्थांपर्यंत यशस्वी होण्यासाठी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील दृष्टिकोनानुसार गुंतवणूक आणि संसाधने यांचा मेळ घालण्यासाठी, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यगटाचे सदस्य सचिव उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी व सक्षम सनियंत्रणासाठी म्हणून हा कार्यगट काम करणार आहे. डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार विविध विषयांवर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणे व धोरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत चर्चा करणे, तसेच विषय समित्यांच्या अहवालातील शिफारशींनुसार विभागामार्फत करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेणे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात करावयाचे बदल याविषयी धोरणात्मक चर्चा करणे, अशी या कार्यगटाची कार्यकक्षा असणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news