Iqbal Kaskar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रूग्णालयात

Iqbal Kaskar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर रूग्णालयात

Published on

पुढारी ऑनलाईन:  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरच्या काल रात्रीपासून अचानक छातीत दुखू लागले. यानंतर मुंबईतील जे.जे रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. डी गँगचा सदस्य असलेला इक्बाल कासकर सध्या खंडणीप्रकरणी ठाण्याच्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

शनिवारी (दि.20) दुपारनंतर अचानकपणे  इक्बाल कासकरच्या छातीत दुखू  लागले आणि त्याला त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्याला तळोजा तुरुंगातून थेट मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर इक्बालला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन  दाऊदच्या नावाने करायचा खंडणी गोळा: ईडी

काही महिन्यांपूर्वी ईडीने दिलेल्या अहवालात म्हटले होते की, इक्बाल कासकर हा भाऊ अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाखाली सेलिब्रिटी आणि बिल्डर्सकडून खंडणी उकळत असे. कासकर हा दाऊदने चालवलेल्या टोळीचा महत्त्वाचा सदस्य असून धमकावणे, खंडणी उकळणे यासारख्या कारवायांमध्ये सामील असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. इक्बाल कासकरला ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये खंडणीप्रकरणी अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबत गेल्या वर्षभरात 3 ते 4 वेळा संपर्क झाल्याची कबुली चौकशीदरम्यान त्याने पोलिसांना दिली आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news