शिवसेना: ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्रीपद, म्हणून पक्षात महाभारत; चित्रा वाघ यांची टिका | पुढारी

शिवसेना: ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॉयला मंत्रीपद, म्हणून पक्षात महाभारत; चित्रा वाघ यांची टिका

पुढारी ऑनलाईन : शिवसेना पक्षातील ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केले आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले. सत्तेची खुर्ची काही केल्या सुटत नव्हती आणि पुत्रप्रेमदेखील संपत नव्हते. याचा परिणाम म्हणजे शेवटी पक्षातच महाभारत घडलं, अशी टिका भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर केला आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेले आहे. पुत्रप्रेमाच्या मोहात अडकल्यामुळेच पक्षातच महाभारत घडलं. आता तरी उद्धव ठाकरेंनी डोळ्यावरची पट्टी काढावी आणि आपल्या डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा. देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसाने सोडली नसल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरेंना उद्देशून त्यांनी केले आहे.

आता कंसाने भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केल्याचे चित्रा वाघ यांनी किशोरी पेडणेकर यांना उद्देशून वत्कव्य केले आहे. अशा कितीही पुतणामावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरेल. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं, असा इशाराही चित्रा वाघ यांनी दिला आहे.

हेही वाचा:

Back to top button