Uttar Pradesh : प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी निवासी भागात शिरले (पाहा व्हिडिओ) | पुढारी

Uttar Pradesh : प्रयागराजमध्ये गंगा-यमुनेचे पाणी निवासी भागात शिरले (पाहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाइन डेस्क : Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील गंगा-यमुना नद्यांचे पाणी निवासी भागात शिरल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबतचा व्हिडिओ एएनआयने ट्वीट केला आहे. नागरिकांना जायला रस्ते उरले नाही. पाण्यातून वाट काढत गाडी चालवावी लागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार; २० हून अधिक मृत्यू, चक्की नदीचा पूल कोसळला

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण उत्तर भारताला पावसाने चांगलेच झोडपले आहे. हिमाचलप्रदेशमध्ये जवळपास 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकट्या मंडी जिल्ह्यात 13 जणांचा मृत्यू झाला असून 6 जण बेपत्ता आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये देखिल मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगा यमुना दुधडी भरून वाहत आहे.Uttar Pradesh

तर गंगा-यमुनेचे पाणी पात्राबाहेर जाऊन थेट प्रयागराजमध्ये नागरी वस्तीत शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. तर काही ठिकाणी थेट घरात पाणी शिरले आहे. पाण्याचा प्रवाह इतका मोठा आहे की रस्ता क्रॉस करून पलीकडे जाणे देखिल अवघड झाले आहे. नागरिक घराच्या बालकनीमधून हे दृश्य पाहताना व्हिडिओत दिसत आहे.

पाहा व्हिडिओ

हे ही वाचा

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार; रेल्वेपूल पत्यांसारखा कोसळला; पहा व्हिडिओ

ढगफुटीमुळे हिमाचल, जम्मूमध्ये चौघांचा मृत्यू

हिमाचल प्रदेश : धर्मसंसदेतील आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका

Back to top button