कोल्‍हापूर : राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे : मंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील | पुढारी

कोल्‍हापूर : राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे : मंत्री राधाकृष्‍ण विखे-पाटील

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा राज्यात काँग्रेसचे अस्तित्व राहिले कुठे, अशा शब्दात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली. वाळू बाबत राज्याचे धोरण लवकरच ठरविण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. महसूल मंत्री झाल्यानंतर ते आज (रविवार) प्रथमच कोल्हापुरात आले होते. विमानतळावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. राज्यात केवळ मंत्रीपदापुरते काँग्रेसचे अस्तित्व होते. ना नेत्यांना पक्षात स्वारस्य होते, ना पक्ष नेतृत्वाला स्वारस्य होते असे ते म्‍हणाले.

अवैध वाळू उपसा ही राज्याला लागलेली कीड आहे. याबाबत सर्वंकष धोरण आणले जाईल, असे सांगत राज्य गेल्या अडीच वर्षात पिछाडीवर गेले आहे. राज्याला पुनवैभव प्राप्त करून देऊ असेही ते म्हणाले.

शिर्डी मतदारसंघातुन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना हा मतदारसंघ राखीव आहे. याबाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तो मान्य असेल असेही त्यांनी सांगितले. इचलकरंजी स्वतंत्र तालुका करण्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, आ. प्रकाश आवाडे यांनी मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की मी करणार.

हेही वाचा : 

Back to top button